Digestive Disorders

…म्हणून कितीही प्रयत्न केले तरी पोट साफ होत नाही

सकाळी उठल्यावर शौचास जाऊन दिवसाची सुरुवात करणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.

शौचाला जाऊन आल्यानंतर ऑफिसला जाणं, घरची कामं करणं अशा अंग मेहनतीच्या कामांना सुरुवात होते. पण सध्याच्या या ‘न्यू नॉर्मल’मध्ये या गोष्टी होताना दिसत नाहीत. अंग मेहनत तर सोडाच पण खाण्या- पिण्याच्या पद्धती आणि वेळाही बदलल्यामुळे त्याचा थेट परिणाम पोटावर होतो. त्यातही काहींना पोट साफ करण्यासाठी चहा, कॉफी, सिगारेट, चुर्ण किंवा औषधांचा आधार घ्यावा लागतो.

एक गोष्ट लक्षात ठेवा की पोट साफ होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. आपला आहार, व्यायाम या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने असतील तर कोणत्याही बाह्य गोष्टी घेण्याची गरजच पडणार नाही.

जाणून घ्या पोट साफ न होण्याची काही मूलभूत कारणं

 • अतीप्रमाणात पाणी प्यायल्यानेही अनेक आजार होतात
  फार कमी लोकांना माहीत आहे की, गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत. सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्यायल्यास पोट साफ होतं असा अनेकांचा समज आहे. पण हा चुकीचा समज असून असं कधीच होत नाही.
 • शौचासाठी जाणीवपूर्वक पोटावर ताण देऊ नका

आर्युवेदात म्हटल्यानुसार कोणतीही गोष्ट जेवढी नैसर्गिकरित्या शरिरात होते तेवढीच ती शरीरासाठी लाभदायक असते. तसेच जर नैसर्गिकरित्या शौचास होत असताना इतर कामांमुळे ते थांबवून ठेवणंही शरीरासाठी तेवढंच घातक आहे. यामुळे पोटात गॅस होणं, डोकं दुखणं, पोटऱ्या दुखणं, गुडघ्यांमध्ये अवघडल्यासारखं वाटणं, मळमळं यांसारखे आजार उद्भवू शकतात. एवढंच नाही तर काहींना हृदयविकारही होऊ शकतो.

 • शौचाला बसताना भारतीय पद्धतीचा वापर करणं केव्हाही चांगलं

-सध्या सगळीकडे कमोडचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण भारतीय पद्धतीने शौचास बसण्याहून चांगली पद्धत कोणतीच नाही. पाश्चात्य पद्धतीमध्ये योग्य प्रकारे ताण येत नाही, पर्यायाने पोट साफ न होण्याचे त्रास उद्भवतात. वृद्धांना गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे त्यांच्यासाठी कमोड पद्धत योग्य आहे.

 • शौचास जाताना पेपर- मोबाइलचा वापर करणं
  नेहमी लक्षात ठेवा की मल त्याग करताना तुम्हाला तुमच्या शरीराचं निरीक्षण करण्याची एक उत्तम संधी मिळते. त्यामुळे त्या वेळेत इतर गोष्टी करण्यापेक्षा स्वतःच्या शरीराचं निरीक्षण जरूर करा
 • मल परीक्षण करणंही शरीराची गरज-
  मल परीक्षण करण्याचेही अनेक प्रकार आहेत. पण त्यातही सोप्पा उपाय म्हणजे मल हे एकसंध असावं. ते पसरट, पातळ किंवा चिवट असू नये.

जर मल एकसंध न येता इतर प्रकारे शरीरा बाहेर येत असेल तर आपल्या खाण्या- पिण्यात काही बदल झालेला असू शकतो किंवा शरीरच आत गेलेल्या चुकीच्या गोष्टी बाहेर काढून टाकत असते. त्यामुळेच दररोज स्वतःचं मल परीक्षण करावं.

मल परीक्षा कशी करावी?

योग्य पचन होऊन तयार झालेलं मल हे नेहमी पाण्यावर तरंगते.जर ते पाण्यात बुडत असेल तर तुम्हाला अजून ही अपचन आहे अस समजावे

दुर्गंध युक्त मल

भसरट मल प्रवृत्ती होणे.

ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या मलाचे निरीक्षण करू शकता.

डॉ सुशांत नागरेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *