Covid अनुभव

Covid 19 अनुभव.

Covid 19 बद्दल जनजागृती चे काम आम्ही मार्च पासून करत आहे. सुरवातीला covid19 चे रुग्ण कमी होते .जसे रुग्ण वाढत चालले आहेत शास्त्रांज्ञाना या विकारा बद्दल जास्त माहीत मिळत आहे.

आशा प्रकारे मला आलेला एक रुग्ण अनुभव मी तुम्हला सांगणार आहे . या लेखा मध्ये माझा वौयक्तिक अनुभव आहे. पण ह्या अनुभवा चा फायदा alert राहण्यासाठी इतरांना होणार आहे .

एक जुने सांधे दुःखी चे रुग्ण दवाखान्यात नेहमी प्रमाणे चिकित्सा घेण्यास आले होते .

त्यांच्या बरोबर , त्यांच्या आई सोबत म्हणून आल्या होत्या.

Waiting room मध्ये असताना त्या सतत नाक पुसत होत्या.

रुग्ण तपासून झाल्या वर त्यांना सहज विचारलं ‘तुम्हला सर्दी खोकला झाला आहे की काय ?’ (female /61yr)

त्या म्हणाल्या ‘ नाही हो हे नेहमीच होतं पावसाळ्यात’ आणि बोलता बोलता त्यांना थोडासा खोकला आला .

म्हणून मी विचारलं ” खोकला कधी पासून आहे ?”

त्या म्हणाल्या “आता पहिल्यांदाच आला”

माझे जुने रुग्ण असल्या कारणाने त्यांचे SpO2 check केले. SpO2 99 होत . थोडासा अशक्तपणा होता.

no fever , no cough, no breathlessness

त्यावर त्या म्हणल्या
“doctor माझी शुगर काल वाढली होती त्यामुळे हा अशक्तपणा आहे.”

गेल्या दोन महिन्यात माझ्या प्रॅक्टिस मध्ये 6 रुग्ण असे सापडले होते की त्यांना covid detect झाला आहे आणि त्याच बरोबर नव्याने त्यांना शुगर सुद्धा डिटेक्ट झाली (ह्या 6 रुग्णांमध्ये माझा collage friend सुद्धा होता)

त्यामुळे जेव्हा मला कळलं की त्यांची शुगर काल वाढली होती. मी ताबडतोब त्यांचा Respiratory rate (RR) check केला.RRम्हणजे आपण 1 मिनिटात किती वेळा श्वास उच्छ्वास घेतो. Normal व्यक्ती 12 ते 16 वेळा श्वास घेतो आणि सोडतो.

जर एखादी व्यक्ती 18 पेक्षा जास्त वेळा श्वास उच्छ्वास घेत असेल तर त्या व्यक्तीला डॉक्टर ने तपासणे गरजेचे आहे.

माझ्याकडे आलेल्या रुगणाचा RR 28 होता.त्यामुळे covid +ve असण्याची शक्यता खूप आहे असे मला वाटल.

आता त्यांना जर swab test करायला सांगितलं तर ते घाबरणार .Swab test चा result यायला पण 24 तास लागणार .CT scan केला तर ताबडतोब कळेल रुग्ण Covid19 +ve आहे की -ve आहे .

म्हणुन त्यांना समजावून सांगितला आपण CT scan करून घेणे गरजेचे आहे .अर्थातच त्यांची इच्छा नव्हती.

पण मागे लागून त्यांना मी त्याच दिवशी radiologist कडे पाठवलं. लगेच CT scan करून घेतला .

Provisional report आला.

CORAD score 5 आणी seviarity score 11 out of 25 .ह्या score वरून कळते की रुग्ण गंभीर अवस्थेत आहे की सौम्य अवस्थेत आहे.

CT scan चा result बघून ताबडतोब त्यांना admit केले.
रुग्ण.

रुग्ण hospital मध्ये पोहचल्या आणि त्यांना जास्त प्रमाणात खोकला सुरू झाला.

हॉस्पिटल ला ऍडमिट केल्या नंतर त्यांचा swab test घेतला. आणि तो +ve आला.

आता रुग्ण ऍडमिट आहे योग्य पद्धतिने त्यांची चिकित्सा सुरू आहे .

Covid इतर अवयवांवरही दुष्परिणाम करत आहे .त्यामुळे इंटरनेट वर बघून उपाय करत न राहणे प्रत्यक्ष डॉक्टरांना दाखवून च योग्य निर्णय घेणे .

हा माझा वैयक्तिक अनुभव आहे .

धन्यवाद 🙏

डॉ सुशांत नागरेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *