Immunity booster-Corona नंतर फुफ्फुसांची ताकत कशी वाढवाल?

Covid19 हा virus जगभर पसरत आहे. हा virus  प्रामुख्याने फुफ्फुसांवर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांची ताकत काहीप्रमाणात कमी होत आहे.

सर्वच covid च्या रुग्णांना हा त्रास होत नाही. ज्यांचे फुफ्फुस जास्त infected आहे त्यांनाच हा त्रास होऊ शकतो.फुफ्फुस किती प्रमाणात infected आहे हे आपल्याला CT scan ने समजू शकते. CT scan मध्ये severity score दिला जातो त्यावरून आपल्याला कळते की फुफ्फुस किती infected ahe .(तुमचे डॉक्टर तुम्हला यासाठी योग्य मार्गदर्शन करतील.)

Severity score

1)फुफुसांची ताकत कशी वाढवायची? Immunity booster

उपाय न.1- फुफुसांची ताकत वाढवण्यासाठी फुफुसांचा व्यायाम करावा.आता तुम्ही म्हणाल फुफुसांचा व्यायाम कसा करायचा. Spirometry म्हणून एक instrument आहे. याचा वापर करून तुम्ही फुफुसांची ताकत वाढवू शकता.जर तुमचे फुफ्फुस अशक्त झाले असतील तर हा उपाय डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील.

Spirometry

उपाय न.2- वर्धमान पिंपळी

पिंपळी नावाची वनस्पती फुफुसांची ताकत वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

पिंपळी घेण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे. त्याला म्हणतात वर्धमान पिंपळी.या मध्ये आपलं वय , वजन आणि आपला आजार यावरून तुम्हला याचा वापर कसा करायचा आहे हे ठरवता येते. ह्याचा वापर शक्यतो आयुर्वेद वैद्यांच्या निरीक्षणा खालीच करावा.

पिंपळी क्षीरपाक:- पिंपळी घ्यायची असेल तर दुधाबरोबर तुम्ही घेऊ शकता

पिंपळी 5ग्राम + 50ml दूध +100ml पाणी हे सर्व एकत्र करून उकळवून 75ml होई पर्यंत उकळवून घेणे.सकाळी उपाशीपोटी घेणे असे 20 दिवस घेणे.( डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे)

उपाय न.3- मनुका

प्रकार 1-

20 काळ्या मनुका 1ग्लास पाण्यात रात्र भर भिजत ठेवणे व सकाळी नाश्त्या पूर्वी मनुका खाऊन तेच पाणी पिणे .

प्रकार 2-

10 काळ्या मनुका 100ml दुधात उकळवणे 50ml शिल्लक ठेवणे व सकाळी उपाशी पोटी हे दूध घेणे (दुधातील मनूका खाल्या तरी चालतील.)

सूचना:- हे तिन्ही उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.spirimetry आणि वर्धमान पिंपळी चा उपाय प्रत्यक्ष डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. हे दोन्ही करण्यासाठी काही विशेष सूचना समजून घेणे गरजेचे आहे .

पिंपळी क्षीरपाक आणि मनुका यांचा वापर तुम्ही करू शकता.शक्यतो पिंपळी चांगल्या quality ची घेणे गरचे आहे .

नियमित व्यायाम व आहार यांचे योग्य नियोजन करा. हे सर्व केल्याने तुमच्या फुफुसांची ताकत चांगली वाढेल व immunity boost होण्यास मदत होईल.

जर हा लेख तुम्हला उपयोगी वाटलं असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की share करा.

डॉ सुशांत नागरेकर

नवी मुंबई

6 thoughts on “Immunity booster-Corona नंतर फुफ्फुसांची ताकत कशी वाढवाल?”

  1. Sunil Shivaram Pashte

    डाॕक्टर,नागरेकर,आपण खूप बहुमोल मार्गदर्शन पर लेख लिहिलेला आहे.नक्कीच सर्व गरजूंना याचा फायदा होईल,तुमच्या या वैद्यकिय कार्याला मनापासून शुभेच्छा.

  2. Dr. Thank you very much for your valuable information. I wish you best wishes for your next video. Thanks and regards, Dilip Kurhade.

  3. Sir पिंपळी या वनस्पतीचा फोटो टाकला तर बरे होईल.

  4. Susmita Mahadev Walake

    खुप छान माहिती दिलीत सर काढा आणि गरम पाणी पिणे कोरिना साठी योग्य की अयोग्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *