या तीन कारणांमुळे वजन वाढते

वजन वाढण्यासाठी सध्याची जीवनशैली कारणीभूत आहे . अतिप्रमाणात आहार, व्यायाम न करणे, एका जागेवरती जास्त वेळ बसून राहणे, शारीरिक हालचाल अजिबात न करणे या अशा कारणांमुळे वजन वाढते. अशाप्रकारे वाढलेले वजन हे कमी होण्यास थोडे कठीण असते. आपलं वजन का वाढत आहे यावर जर आपण विचार केला तर आपल्याला काही विशेष कारण सापडतील .आज मी तुम्हाला हीच कारणे सांगणार आहे.

वजन वाढण्याचे कारण जर तुम्हाला समजले तर तुम्ही त्या कारणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्हाला कारणच समजलं नाही तर तुम्ही त्या कारणांपासून दूर राहणार नाही आणि तुमचं वजन वाढतच जाणार आणि मग वजन कमी होत नाही असं पाहून तुम्हाला निराशा येणार. त्यामुळे सर्वात पहिलं तुमचं वजन का वाढत आहे या गोष्टीचा शोध घ्या .ही कारणे शोधा आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही जास्त वजन कमी वेळात कमी करू शकता.

वजन जर जास्त असेल तर सर्वात पहिले आपली immunity ही कमी व्हायला सुरुवात होते आणि immunity कमी असल्याकारणाने विविध आजार शरीरामध्ये घर करून बसतात . त्याचबरोबर डायबेटिस, ब्लडप्रेशर , कोलेस्ट्रॉल असे आजार शरीरामध्ये वाढण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे आपलं वजन प्रमाणामध्ये ठेवणं हे महत्त्वाचं असतं.

वजन प्रमाणात ठेवण्यासाठी आपलं वजन नक्की कशामुळे वाढते हे आपण माहीत करून घेणे गरजेचे आहे वजन वाढण्याची मुख्य तीन कारणे आज आपण बघणार आहोत

1) Surrounding=

भारतामध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आलेल्या देवाला नैवेद्य भरभरून देणे ही आपल्याकडची प्रथाच आहे.पण मित्रांनो पण देवच ठरवत असतो त्याने कोणता नैवेद्य स्वीकारायचा आणि कोणता नैवेद्य नाकारायचा. वजन वाढण्याच्या कारणांमध्ये हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे . आपण याचा कधी विचारही करत नाही .

आपण जेव्हा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जातो किंवा नातेवाइकांच्या घरी जातो त्यावेळेला आपल्याला नेहमी आग्रहाचे जेवण घ्यावे लागते याचा आग्रहामुळे आपलं वजन वाढत असत.

” एक दिवस diet नाही केलास तर काय लगेच वजन वाढणार नाही .”

अस म्हणून आपल्याला आग्रह केला जातो आणि आपणही तासाच विचार करतो आणि diet मोडतो . अस हे आठवड्यातून एकदा जरी झालं तरी सुद्धा तुमचं वजन कमी होणार नाही.त्यामुळे तुमचं surrounding काय आहे हे नक्की बघा.

2) निश्चित goal नसणे

“आपल्याला जर माहीतच नाही की आपल्याला जायचं कुठे आहे .तर आपण पोहचणार कुठे.”

जर आपण ठरवलं की आपल्याला 10 kg वजन कमी करायचे आहे तर आपण प्रयत्न ही तसेच सुरू करू. आणि जर आपलं goal निश्चित असेल तर कोणी खाण्यासाठी आग्रह जरी केला तरीही आपण ते आग्रहाचे जेवण घेणार नाही.

जो पर्यंत आपण आपलं goal achive करत नाही तो पर्यंत आपल्याला वजन कमी करण्याचे नियम पाळणं गरजेचे असते. त्यामुळे मना मध्ये किती वजन कमी करायचे आहे हे निश्चिंत करणे महत्वाचे आहे.

3)Procarnistation

प्रत्येक काम पुढे ढकलण्याची वृत्ती असणे .मित्रानो हे फक्त कारण नसून लक्षण सुद्धा आहे.

प्रत्येकाच्या मनात वजन कमी करण्याची इच्छा असते.पण नुसती इच्छा असून वजन कमी होत नाही. आपण नेहमी विचार करतो उद्यापासून व्यायाम आणि डाएट सुरू करू. पण हा उद्या कधी येतच नाही. “उद्या करू” या विचारसरणी मुळे वर्ष निघून जातात आणि आपलं वजन वाढत जाते.त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज पासून किंवा आता पासून सुरू करू . काम पुढे ढकळण्या च्या वृत्ती मूळे वजन हे वाढतच जाते.

या तीन कारणांमुळे वजन कमी होत नसते . ही कारणे जर तुम्ही सुद्धा अनुभवत असाल तर आताच ह्या तिन्ही कारणानां तुमच्या पासून दूर करा आणि मग बघा वजन कसे कमी होत जाईल तुमचे.

पोट कमी करण्यासाठी पोटाचा व्यायाम चुकूनही करू नका click

लेख कसा वाटला हे आम्हला नक्की कळवा.

# मी मराठी , फिट मराठी

डॉ सुशांत नागरेकर

5 thoughts on “या तीन कारणांमुळे वजन वाढते”

  1. Dr Sachin Ghorpade

    These are very very important thinks, On Which generally peoples ( Obese) does not focus, due to which they doesnt get Result to loose weight….

  2. गजानन पळसुलेदेसाई

    खुप ऊपयुक्त माहीती दिलीत डाँ.सुशांतजी धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *