Immunity booster Corona पासून स्वतःचा बचाव कसा कराल

जर कोणाला सर्दी खोकला झाला असेल ,
मग तो कोणता ही असो  ,
सर्वात पहिले आपल्या पासून दुसऱ्या कोणाला होऊ नये याची काळजी घ्यावि .
मग तो फ्लू असला तरी ही ,
यासाठी कोणती काळजी घ्यावी ?

सर्दी खोकला झालेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी
1)  मास्क चा वापर करावा.


2) स्वतःचे कपडे, भांडी , अंथरून वेगळेच ठेवावे.


3) साबणाने स्वच्छ  हात धुवावे (20sec)


4) कुठे ही थुंकू नये.


5) 14 दिवस घरा बाहेर निघू नये .


6) काही त्रास झाल्यास न घाबरत धीट पणे डॉक्टर कडे जाऊन तपासून घ्यावे व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागावे.


7) आजाराचे निदान स्वतःच करू नये . डॉक्टरांकडुनच निदान करून घ्यावे.


8) ज्येष्ठ नागरिक लहान मुल , diabetes , blood pressure  किंवा कुठल्याही दुर्धर व्याधी ने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीनं पासून 1 मीटर दूर राहुनच संपर्क करावा . आपल्यामुळे त्यांना काही त्रास होऊ नये .


9)  बाहेरून जर काही सामान आणायचे असेल तर घरातील तरुण आणि सशक्त व्यक्तीलाच  बाहेर पाठवावे ( ते ही गरज असेल तरच). शेजारी व आपल्या घरातून एकाच व्यक्तीला पाठवावे .दोन  किंवा 3 फॅमिली ची बाहेची कामे करण्यासाठी एकाच व्यक्तीला पाठवावे.


10) जर तुम्हाला सर्दी असेल तर लगेच आपल्याला कोरोना झाला आहे अशी शंका मनात बाळगून घाबरून जाऊन नये.डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेणे.

11) अपचन होणार नाही याची काळजी घ्यावी.

12) दररोज 20min व्यायाम करावा.याने शरीर सशक्त राहते व शरीराचे बळ वाढते.बळ वाढल्याने immunity boost होण्यास मदत होते.

13) अति चिंतन करून मनाचा ताण वाढवू नये . मनाचा ताण वाढला तर त्याचा परिणाम immunity वर होऊ शकतो.

जर तुम्हाला सर्दी , खोकला , जुलाब , ताप असेल तर त्याला धीट पणाने सामोरे जा .देश सेवा व विश्व सेवा  करण्याची हीच संधी आहे .

“स्वस्थ रहा , मस्त रहा”

डॉ सुशांत नागरेकर

31 thoughts on “Immunity booster Corona पासून स्वतःचा बचाव कसा कराल”

  1. वैद्य महोदय, तुम्हीच आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार! पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा!

    1. प्रा संध्या विजय देशपांडे

      अतिशय उपयुक्त माहीती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या पुढील कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा

  2. Aaple blog aani videos fear nahisa karun rogachi achuk mahit‌‌i detat… Aaple manapasun Aabhar!

  3. धन्यवाद सर. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल. मी सुद्धा माझ्या मित्राच्या संपर्कात आलो आहे ५ दिवस झाले त्याला. माझ्यात काहीच लक्षण नाहीत . आरोग्य सेतू ऍप मधे माझा कॉन्टॅक्ट १६ aug cha dakhvtoy . सध्या मी घरीच isolation mdhe aahe. तरी आपले योग्य मार्गदरशन मिळावे ही विनंती.

  4. डॉ श्री किरण घाडगे

    डॉ सुशांत नागरेकर हे नाव आता अचुक माहीतीसाठी घेतलं जातय. कोरोना माहीतीचे खुप सोर्स असताना खरी माहीती मिळेल असा प्लँटफॉर्म आपल्या रुपाने जनसामान्यांना उपलब्ध केला याबद्दल आपले खुप खुप आभार. आपले समाज सेवेचे हे कार्य अखंड चालु राहो ही श्री छत्रपतिं चरणी प्रार्थना ।

  5. दावर ए खान

    धन्यवाद डॉ. साहेब,
    खुप छान माहिती दिली. तसेच आपण युट्युबवर आजाराच्या दिलेला सल्ल्याने बरीच माहिती मिळाली व आत्मविश्वास वाढला।

  6. Dr D. U. Chaudhari.

    Sir, you are provided must information.
    And beautiful drafting. to the words. Simple and meaninig ful. Exalant…

  7. Sir, you are doing a great social work. The videos are very informative. The above information is very useful. Thanks.

  8. Atish V. Magdum

    शुभ सकाळ सर,
    आपण दिलेली माहिती खरच खूप उपयोगी आहे.
    मला 1 प्रश्न आहे.
    मी एका पोसिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात होतो बराच वेळ त्या नंतर मला 3 दिवसांनी समजलं की तो रुग्ण pneumonia + कोरोना पोसिटीव्ह आहे. संपर्कात आल्यापासून सहाव्या दिवशी मी antigen test केली ती निगेटीव्ह आली आहे आज त्या दिवसापासून 11 दिवस झाले मे isolate आहे Symptoms अजून 1 ही नाही पण मनात थोडी भीती आहे कारण घरी आई आणि वडील above 65 yrs आहेत आणि माझा मुलगा 2 वर्षाचा आहे.
    योग्य मार्गदर्शन करावे.
    अतिश मगदूम
    अब्दुल लाट
    जिल्हा कोल्हापूर

  9. ज्ञानेश्वर नामदेव शिंदे

    नमस्कार डॉक्टर साहेब….खुप खुप धन्यवाद तुमच्या या समाजसेवेला .. ??जय महाराष्ट्र?

  10. Umakant Deshmukhe

    You always provide us very good useful information for health.
    Your You tube channels is good source of health knowledge.
    Thanks.Stay blessed.

Comments are closed.


Fatal error: Uncaught Error: Class 'Elementor\Plugin' not found in /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php:422 Stack trace: #0 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-includes/class-wp-hook.php(308): Essential_Addons_Elementor\Classes\Bootstrap->render_global_html('') #1 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-includes/class-wp-hook.php(332): WP_Hook->apply_filters(NULL, Array) #2 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-includes/plugin.php(517): WP_Hook->do_action(Array) #3 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-includes/general-template.php(3065): do_action('wp_footer') #4 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-content/themes/astra/footer.php(33): wp_footer() #5 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-includes/template.php(783): require_once('/home/oavvaibaq...') #6 /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-includes/template.php(718): load_template('/home/oavvaibaq...', in /home/oavvaibaqqs5/public_html/arogyabhet.com/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php on line 422
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.