Categories
Health immunity booster

पित्तासाठी घरगुती उपाय Homeremedies for acidity

पित्त हे अग्नी महाभूत प्रधान असते. एखाद्या पदार्थाचे दुसऱ्या पदार्थांमध्ये रूपांतर करण्याची सामर्थ्य हे अग्नीमध्ये असते.

आपण जो आहार घेतो त्या आहाराचे आहार रसामध्ये रूपांतर करण्याची सामर्थ्य हे पित्ता मध्ये स्थित अग्नी करत असते.

या आहार रसाचे रूपांतर शरीरातील घटकांमध्ये करण्याचे काम सुद्धा ही अग्नीच करत असते.अन्न पचवण्यासाठी पित्त एक महत्वपूर्ण घटक द्रव्य आहे .आपली immunity boost करण्यासाठी पित्त कार्यरत असते. 

पित्त जर प्राकृत असेल तर आपली पचन क्रिया चांगली असते. पचन क्रिया चांगली असेल तर आहार योग्य पद्धतीने पचतो आणि आपल्या शरीराला योग्य पोषण देतो .आपल्या शरीराला योग्य पोषण मिळाल असता आपली immunity boost होतें. म्हणून पित्त हे नेहमी प्राकृत असणे गरजेचे आहे.

हेच पित्त्त प्राकृत ठेवण्यासाठी काय करावे?

पित्त प्राकृत ठेवण्याचे उपाय :

  • 1 ) योग्य वेळेला आहार घेणे (भूक लागली असंताना आहार न घेणे ही सवय टाळावी)

  • 2)अतिप्रमाणात आहार टाळावा . आपल्याला जेवढी भूक आहे तेवढाच आहार घेणे.

  • 3) पोटात जळजळ होणे , पोटात मळमळणे , डोकं देखणे हे त्रास होत असल्यास

  • 1च बडीसोफ + 1च धणे+ 1च खडी साखर हे सर्व एकत्र  1ग्लास पाण्यात उकळवून अर्धा ग्लास होई पर्यंत उकळवणे व गाळून घेणे . त्यानंतर हा काढा  एकाच वेळेला न घेता या काढया मधील 2 च दर 5मिनिटांच्या अंतराने हळू हळू घेत राहावे. असे सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा करणे 

(*ज्यांना मधुमेह आहे त्यांनी या मध्ये साखरेचा वापर करू नये)

4) 3 च आवळा ज्यूस + पाव च सुंठ + 1च खडी साखर सकाळी उपाशी पोटी घेणे

5) अंगावर पित्त उठण्याचा त्रास असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा

https://youtu.be/VEj3arDaFO4

हे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता .ह्या उपायाने  acidity चा त्रास खूप चांगल्याप्रकारे कमी होतो. जर त्रास कमी नाही झाला तर तुमच्या जवळच्या doctors ना दाखवून घ्या 

-आरोग्यभेट

डॉ सुशांत नागरेकर 

12 replies on “पित्तासाठी घरगुती उपाय Homeremedies for acidity”

माझ्या आईला आम्ल पित्ताचा त्रास होतो खुप मळमळ होणे पोटात खुप जळजळ होणे ऊलटी सारखे वाटणे डोकं दुखणे असे सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा होते काही आयुर्वेदिक उपचार केले व ऍलोपथी उपचार सुरू आहेत पण काही फरक पडत नाही तुम्ही काही उपचार सुचवा.

खूप छान माहिती सांगितली तुम्ही.
पित्तामुळे नेहमी बारीक ताप येतो.
त्यावर उपाय सांगा . प्लीज.

Chan mahiti sagata tumhi sir पित्त म्ह्णजे मला छातीत खूप जळजळते खाली सुद्धा वाकता येत नाही त्यासाठी काही उपाय आहे का plz reply

तुमचे सर्व आरोग्य व्हिडिओ मी बघतो. मला आवडतात ते. आणि माहिती पण मिळते. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला अन्न नलिकेत अन्न अडकल्या सारखं वाटतं. आणि सतत कोरडी उचकी येते. तर मी काय करू. श्वास मोकळा होत नाही. हा acidity cha trass àahe ka. घरगुती उपाय सुचवा

संध्याकालि माजा अगावर मोठ मोठें फोड़ येउन अंगखाजवत रात्रि झोप येत नहीं फकत खाजवत रहवा वाटत ।. दोन टें तीन वर्ष पासून त्रास होत आहे उपाय सांगा , गोली atrax व आऊरवेदीद ऊपाय करुण पाहिलेत फरक पढ़त नाहीं सर

माझ्या मुलाला पित्ताचा खूप त्रास होतो….कार ,बस मधे परवास करताना उलट्या होतात ..डोके दुखते…आपचनाचा त्रास होतो….पोट फुगते… खूपच त्रास होतो….please कांहीतरी उपाय सांगा…हा त्रास पित्ताचा आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *